
नोकरीनिमित्त इस्रायलला गेलेल्या हिंदुस्थानी नागरिकाची हत्या करण्यात आली. जेरुसलेम येथील राहत्या खोलीत हिंदुस्थानी नागरिकाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. पीडित आणि आरोपी दोघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जेरुसलेमच्या कटामोन भागातील एका अपार्टमेंटमध्ये 40 वर्षीय हिंदुस्थानी नागरिक मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर, मोरिया पोलीस स्टेशनचे अधिकारी फॉरेन्सिक तपास अधिकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपास सुरू केला, असे इस्रायली पोलीस प्रवक्त्यांच्या युनिटने ईमेलद्वारे दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. या हत्येप्रकरणी 31 वर्षीय इस्रायली नागरिकाला अटक करण्यात आली आहे. संशयिताची चौकशी सुरू आहे.

























































