
नवी मुंबईहून तिरुवनंतपुरम प्रवास करणाऱ्या इंडिगो विमानात एका सहा वर्षांच्या मुलीचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. विमानात उपस्थित असलेले अनेक डॉक्टर आणि एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, त्यांना यश आले नाही. दुर्दैवाने चिमुकलीचा मृत्यू झाला.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोच्या 6E 2040 या विमानात 25 जुलै रोजी ही घटना घडली. हे विमान सकाळी 10.30 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वरून रवाना झाले. त्यानंतर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. एका प्रवाशाने विमानात घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे.




























































