Mumbai News – लोकमान्य टिळक टर्मिनसवर 11 दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनसवर 11 दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी 8.00 वाजल्यापासून 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

शंटिंग नेकचे बांधकाम, सिक साइडिंगमध्ये बदल, देखभाल साइडिंग यार्ड, देखभाल साइडिंग क्र. 6, 7, 8 आणि 9 मधील ‘पिट लाइन्स’चा विस्तार, तसेच पाणीपुरवठा वाहिनी, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीचे वळण बदलणे आदि कामांसाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉकचे आयोजित केला आहे.

ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक 12154 राणी कमलापती – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस (3 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान) शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील.