
Commonwealth Games 2026 मध्ये हिंदुस्थान बॉक्सिंगमध्ये पदकांच्या प्रतिक्षेत होता. मात्र, हिंदुस्थानची ही प्रतिक्षा प्रीती पवारने संपुष्टात आणली आहे. प्रीती पवारच्या पाठोपाठ जस्मिन लंबोरियानेही सुवर्ण पदकावर मोहोर उमटवत हिंदुस्थानचा तिरंगा ग्लासगोमध्ये अभिमानाने उंचावला आहे.
अंतिम फेरीत प्रीती पवारने 54 किलो वजनी गटाच्या कॅनडाच्या स्कार्लेट सवाना डेलगाडोचा 5-0 असा पराभव करत देशासाठी सहावे सुवर्णपदक जिंकले. प्रीतीने सुरुवातीपासूनच आपल्या शानदार बचावात्मक कौशल्याने आणि अचूक ठोशांच्या जोरावर सामन्यावर पूर्ण पकड ठेवली, ज्यानंतर सर्वच्या सर्व पाच पंचांनी सर्व फेऱ्यांमध्ये तिच्या बाजूने निर्णय दिला. या सुवर्णपदकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रीतीने उपांत्य फेरीत झांबियाच्या कॅथरीन म्वापेचा 5-0 असा धुव्वा उडवला होता.
The first bout of the day ends and it’s a GOLD Medal!
Congratulations to Preeti who dominates her opponent to take the top honours! 🙌🏽🇮🇳
Lets #Cheer4Bharat 💙#WeAreTeamIndia | #TogetherWeDream pic.twitter.com/Q8UJnuFHF3
— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2026
प्रीती पवारने दमदार विजयासह जागतिक बॉक्सिंग कप आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपाठोपाठ या वर्षीच्या कामगिरीत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. प्रीतीच्या या विजयानंतर अवघ्या काही वेळातच 57 किलो वजनी गटात रिंगणात उतरलेल्या जस्मिन लंबोरियाने मायकेला वॉल्शचा पराभव करून हिंदुस्थानचे सातवे सुवर्णपदक नावावर केले. हा सामना अटीतटीचा असला तरी जस्मिनने अखेरच्या क्षणी बाजी मारली आणि सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकींची गळाभेट घेत क्रीडावृत्तीचे उत्तम उदाहरण दिले.
The world champion is now also the Commonwealth Games Champion!! @BoxerJaismine with a unanimous win takes the Gold Medal in the Women’s 57kg Boxing event. Great start to the day! 💙 #WeAreTeamIndia | #TogetherWeDream pic.twitter.com/i5R6XXQ0pT
— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2026





























































