पाकिस्तानात कोळसा खाणीत स्फोट; 32 जणांचा मृत्यू, 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानातील एका कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला असून यात किमान 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दहा जण जमिनीखाली अडकले आहेत. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटाच्या बाहेरील भागात गुरुवारी झालेला हा स्फोट मिथेन वायूच्या साठ्यामुळे झाला असावा, असे सरकारी खाण निरीक्षक घनी बलोच यांनी सांगितले. घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकारी स्फोटाच्या कारणांची सखोल चौकशी करतील आणि खाण सुरक्षा उपायांचा आढावा घेतील, असे बलुचिस्तानचे खाण आणि खनिज मंत्री, शोएब नोशेरवानी यांनी सांगितले. निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचा संशय कोळसा खाण कामगारांच्या एका कामगार संघटनेने व्यक्त केला असून, जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.