
बँक खात्यात नॉमिनी केला नसल्यास जर खातेदारासोबत काही अघटित घडले, तर त्याचे पैसे अडकून राहतात. नॉमिनी नसल्यामुळे दावा न केलेला पैसा सरकारच्या खिशात जाऊ शकतो.
बँक शाखेला भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुमचे (वैयक्तिक/सिंगल) खाते असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारेही नॉमिनीची निवड करू शकता.
परंतु संयुक्त खाते असल्यास तुम्हाला फक्त बँकेच्या शाखेत जाऊन नॉमिनी निवडण्याचा पर्याय मिळेल. शाखेला भेट देऊन फॉर्म भरून नॉमिनी जोडण्याचे काम करता येते.
लक्षात ठेवा की, तुमचा नॉमिनी कायदेशीर वारस असावा. कायदेशीर वारस असल्यासच खातेदारानंतर त्याला पैसे मिळण्याचा अधिकार मिळेल.
मूळ खातेदारानंतर ज्या व्यक्तीला नॉमिनी केले आहे, ती व्यक्ती खात्यातील पैशांची मालक बनते. खात्यातील पैसे फक्त कायदेशीर वारस असलेल्या नॉमिनीलाच हस्तांतरित केले जातात.





























































