
कोयना धरण यापुढे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोयना धरणाला यापूर्वी शिवाजी जलसागर असे संबोधले जात होते. त्याला शिवप्रेमी जनतेने व संघटनांनी आक्षेप घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख योग्य नसल्याने नाव बदलण्याची मागणी होत होती. शिवप्रेमींच्या या रेटय़ामुळे महायुती सरकारला कोयना धरणाचे नामांतर करणे भाग पडले. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला.



























































