
अटल सेतूवर दुचाकीला बंदी असतानाही दोन तरुण या सेतूवरून सुसाट दुचाकी चालवतानाचा थरारक प्रकार समोर आला आहे. गंभीर म्हणजे, विरुद्ध दिशेने हवेशी स्पर्धा करत ते दोघे दुचाकीवरून गेले. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. रविवारी दोन तरुण दुचाकीवरून अटल सेतूवरून वेगात जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विरुद्ध दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या चालकाने हेल्मेट घातले नव्हते. दुचाकीची समोरील नंबर प्लेट तुटलेली असून मागील नंबर प्लेट बाईकस्वाराने हाताने झाकलेली होती. परिणामी अद्याप दुचाकीचाचा नंबर पोलिसांना कळू शकलेला नाही. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्या दोघांचा शोध घेत आहेत.






























































