
देहरादून येथील नंदा की चौकी या ठिकाणी 16 कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल वाहतुकीसाठी खुला होऊन अवघे 16 दिवस होताच खचला. बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आणखी एका भाजपच्या राज्यात पूल खचला आहे.
12 जुलै रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. हा पूल, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या जागी बांधण्यात आला होता. या दुर्घटनेत 14 लोकांचा मृत्यू झाला होता. या पुलाच्या जोडरस्त्याचा मोठा भाग खचल्याने एक मोठा खड्डा तयार झाला आणि हा पूल देहराडून-पाँटा साहिब महामार्गापासून पूर्णपणे तुटला. प्रादेशिक कार्यालयाच्या मुख्य अभियंत्यांना या घटनेच्या कारणाची चौकशी करण्याचे, जबाबदारी निश्चित करण्याचे आणि सर्व पुराव्यांसह तीन दिवसांत सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




























































