Ratnagiri News – महसूल मंत्र्याच्या कार्यक्रमस्थळी सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा साप चावून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या कार्यक्रमासाठी जवाहर मैदानावर साफसफाई करण्यासाठी गेलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या साप चावून दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी घडली. दि.२ ऑगस्ट रोजी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पावसाचे दिवस असल्याने मैदानावर झाडेझुडपे वाढली आहेत. त्याची साफसफाई करण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेचे कर्मचारी पाठवण्यात आले होते.साफसफाई करत असताना कंत्राटी कर्मचारी काशीनाथ गोताड यांना विषारी साप चावला. इतर कर्मचाऱ्यांनी गोताड यांना रूग्णालयात आणले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.