या साउथ सुपरस्टारसोबत काम करायचंय, कृती सेनॉनने नाव सांगत व्यक्त केली इच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवुड अभिनेत्री कृती सेनॉन नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. कृती सेनॉन नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कॉकटेल २’ मध्ये दिसली होती. ज्याने बॉक्स ऑफिसवर जेमतेम यश मिळवले. दरम्यान मुलाखतीत कृतीने टॉलिवूडबद्दल एक रंजक गोष्ट शेअर केली आहे. तिला पुन्हा एकदा साउथ चित्रपटांमध्ये काम करायचे असून विशेषतः एका मोठ्या साउथ सुपरस्टारसोबत काम करण्याची तिची इच्छा आहे.

बॉलीवूडसोबतच कृतीने साउथ इंडस्ट्रीतही काम केले आहे. तिने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘1: नेनोक्काडिने’ या तेलगू चित्रपटातून केली होती आणि साउथ इंडस्ट्रीकडून तिला नेहमीच भरपूर प्रेम मिळाले आहे. या मुलाखतीत कृतीने सांगितले की, संधी मिळाल्यास तिला अल्लू अर्जुन सोबत काम करायला नक्कीच आवडेल. कृती म्हणाली, अल्लू अर्जुन हा एक उत्तम अभिनेता आहे आणि मला पुष्पा चित्रपटातील त्याचे काम खूप आवडले आहे. याशिवाय तिने अल्लू अर्जुनच्या इतर भूमिकांचेही कौतुक केले, कारण त्याने विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत आणि तो प्रत्येक भूमिकेत तंतोतंत बसतो. कृती पुढे म्हणाली की, अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी खूप उत्सुकतेचे ठरेल. तसेच मी ‘पुष्पा ३’ ची उत्सुकतेने वाट पाहत असून बऱ्याच काळापासून त्याच्या कामाची चाहती राहिली आहे.

विशेष म्हणजे, अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या हिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये कृतीने काम केले होते.