
इराण-अमेरिका यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 खलाशांसह एपूण 16 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 75 नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारने संसदेत दिली आहे.
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे ठार झालेले, जखमी झालेले, अडकलेले किंवा सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या हिंदुस्थानी खलाशी आणि अन्य नागरिकांबद्दल सीपीआय (एम)चे खासदार जॉन ब्रिटास यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला होता. सौदी अरब 1, पुवेत 1, ओमान 1, इराक 1, यूएईमध्ये 4 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएई 32, ओमान 24, कतार 4, पुवेत 13, सौदी अरब 1 आणि इस्रायलमध्ये 1 हिंदुस्थानी नागरिक जखमी झाला आहे.





























































