तरुणीविरोधात गुन्हा दाखल करणे हा यंत्रणेचा गैरवापर, रुचिकासाठी ‘कॉक्रोच’ मैदानात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 दिल्लीतील ‘जंतर मंतर’वरील आंदोलनावेळी रुचिका सिंह या तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक टिप्पणी केली होती. यावरून तिच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी तिच्या मदतीला धावून आली आहे. कॉक्रोचचे मुख्य प्रवत्ते सौरभ दास यांनी या गुन्ह्याला विरोध केला आहे. मुलीवर फौजदारी खटल्याऐवजी मानहानीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ही कारवाई म्हणजे शासकीय यंत्रणेचा गैरवापर आहे. या देशात लोक मोकळेपणाने बोलू शकत नाहीत का, असा सवाल सौरभ यांनी केला आहे.

अपशब्द वापरल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही. लोकसभेतील 50 टक्के खासदारांवर आणि त्यापैकी भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आपली ऊर्जा त्या खासदारांवर पेंद्रित करावी, एका 25 वर्षांच्या तरुणीवर नाही. तरुणांचा होणारा हा छळ त्वरित थांबला पाहिजे, असे सौरभ दास यांनी म्हटले आहे.

 गाझियाबाद येथील रहिवासी स्मृती सिंह यांनी नोएडाच्या एक्स्प्रेसवे पोलीस ठाण्यात रुचिकाविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रुचिकाविरुद्ध हेतुपुरस्सर अपमान, सार्वजनिक उपद्रव आणि मानहानीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. नोएडामध्ये झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी तो नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे.