
घाटकोपर पूर्वच्या महापालिका शाळेतील पोषण आहारात काच आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लहान विद्यार्थ्यांना मिळणारे पोषण आहार निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. याबाबत माहिती मिळताच शिवसेनेने शाळेत धाव घेत संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबत खेळ सुरू असल्याचा आरोप करत शिवसेनेने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घाटकोपर पूर्व च्या महापालिका शाळा क्रमांक ३मध्ये हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत माहिती मिळताच महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शाळेवर धडक देत संबंधितांना धारेवर धरले. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी शिवसेना सचिव -नगरसेवक साईनाथ दुर्गे, सचिव इम्रान शेख, उपविभागप्रमुख अजित गुजर, अजित भायजे,
याआधीही न्युट्रीबारमध्ये भेसळ महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘न्युट्रीबार’ (प्रोटीन बार) मध्ये काच, खडे आणि प्लॅस्टिकचे तुकडे आढळत असल्याची धक्कादायक बाब शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी उघडकीस आणली होती. याबाबत त्यांनी सभागृहात हरकतीचा मुद्दा मांडत प्रशासनाला धारेवर धरत दोषी अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
विधानसभा कार्यालयप्रमुख प्रकाश वाणी, प्रसाद कामतेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, शाखाप्रमुख विशाल चावक, मयुरेश नामदास, सुनील भोसतेकर आदी उपस्थित होते.





























































