
मुंबई हवामान वेधशाळेने जारी केलेल्या रेड अलर्टनंतर गुरुवारी व आज शुक्रवारी मुसळधार पावसाने जिह्याला झोडपले. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली असून धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज धरणातून 90 हजार 865 क्युसेक (2,573 क्युमेक्स) वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे तापीला पूर आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्पतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
धरणाचे 36 दरवाजे गेट उघडण्यात आले असून त्यापैकी 8 गेट 1.50 मीटर तर 28 गेट 1.00 मीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, कालव्यामधून 200 क्युसेक (5.66 क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू असून आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. धरणाची पाणीपातळी 211.960 मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.़





























































