नागपुरात साडे सात लाख मतदारांचे काय होणार? ‘बीएलओ’ माहिती घेण्यासाठी पोहोचलेच नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गंत मतदान पेंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन नोंदणी अर्ज देणे गरजेचे आहे. परंतु नागपूरमध्ये अद्यापही 7 लाख 54 हजार 277 मतदारांपर्यंत बीएलओ पोहोचले नसल्याने त्यांना नोंदणी अर्जच मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात एसआयआरची मोहीम 30 जूनपासून सुरू आहे. या काळात बीएलओंना प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन त्यांना मतदार नोंदणी अर्ज देऊन तो भरून घ्यायचा आहे. त्याच प्रमाणे मतदारांची माहिती संगणीपृत (डिजिटलाइझ) करायची आहे. नागपूर जिह्यात 46 लाख 38 हजार 589 मतदार आहेत. यातील 32 लाख 49 हजार 997 मतदारांची तपासणी (मॅपिंग) झाले आहे. तर 38 लाख 84 हजार 312 मतदारांना नोंदणी अर्ज दिल्याची माहिती बीएलओंकडून निवडणूक प्रशासनाला मिळाली. यानुसार 7 लाख 54 हजार 277 मतदारांपर्यंत बीएलओ अद्याप पोहोचले नाहीत. अर्जच मिळाले नसल्याने त्यांची नोंदणीच होणार नाही. पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एसआयआरमध्ये नाव नोंदणी न होणाऱयांचा मतदार यादीत समावेश होणार नाही. त्यामुळे यांना मतदानाच्या हक्कापासून मुकावे लागण्याची भीती आहे.