मान्सूनमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी कोणत्या टिप्सचा वापर करावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता त्वचेवर परिणाम करते. त्यामुळे घाम, तेल आणि धूळ त्वचेवर पटकन साचून पिंपल्स, पुरळ, खाज, बुरशीजन्य संसर्ग आणि त्वचेचा निस्तेजपणा वाढू शकतो. त्यामुळे या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

त्वचेची अशी घ्या काळजी

दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.
चेहरा धुतल्यानंतर हलके मॉइश्चरायझर लावा.
ढगाळ वातावरणातही सनस्क्रीनचा वापर करा.
जास्त घाम आल्यास स्वच्छ टिश्यू किंवा कापडाने चेहरा हलक्या हाताने पुसा.
पावसात भिजल्यानंतर चेहरा आणि शरीर स्वच्छ पाण्याने धुवा.
मेकअप जास्त वेळ ठेवू नका आणि झोपण्यापूर्वी पूर्णपणे काढा.

या चुका टाळायला हव्यात

घाणेरडे टॉवेल, मेकअप ब्रश किंवा उशीचे कव्हर वापरू नका.
ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका.
चेहऱ्यावर वारंवार हात लावणे किंवा पिंपल्स फोडणे टाळा.
जड किंवा अतितेलकट स्किनकेअर उत्पादने वापरणे टाळा.

आहारही तितकाच महत्त्वाचा
त्वचा आतून निरोगी राहण्यासाठी मोसमी फळे, हिरव्या भाज्या, सॅलड, दही, डाळी आणि सुका मेवा आहारात समाविष्ट करा. संत्री, आवळा आणि पेरूसारखी व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे फायदेशीर ठरतात. पुरेसे पाणी प्या आणि तळलेले तसेच अतिगोड पदार्थ कमी खा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
त्वचेवर सतत खाज, लालसरपणा, सूज, पुरळ, पाण्याचे फोड किंवा वारंवार संसर्ग होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार केल्यास समस्या गंभीर होण्यापासून बचाव होऊ शकतो.