
Commonwealth Games 2026 मध्ये आजचा (01 ऑगस्ट 2026) दिवस हिंदुस्थानसाठी पदकांची लयलटू करणारा ठरतोय. बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्ण पदकांच्या पाठोपाठ आता पुरुषांच्या तिहेरी उडीत हिंदुस्थानने दोन पदके पटकावली आहेत. अंतिम फेरीत प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू तिरुमारन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. जमैकाच्या जॉर्डन स्कॉटने सुवर्णपदक जिंकत पहिले स्थान मिळवले.
जमैकाच्या जॉर्डन स्कॉटने चौथ्या फेरीत 16.72 मीटरची उडी मारत सुवर्णपदक निश्चित केले. याच फेरीत प्रवीण चित्रवेलने 16.58 मीटरची सर्वोत्तम उडी मारून जोरदार प्रत्युत्तर दिले, मात्र त्याला जॉर्डनचे अंतर पार करता आले नाही. प्रवीणने सुरुवातीला 16.05 मीटर, त्यानंतर 15.64 मीटर आणि 16.31 मीटर नोंदवले. यानंतर चौथ्या फेरीतील पदकीय उडीनंतर त्याने पाचव्या फेरीत 16.40 मीटर झेप घेतली, तर शेवटचा प्रयत्न फाऊल ठरला.
Double delight in the Men’s Triple Jump event as we win both the Silver and Bronze Medals.
Congratulations to Praveen Chithravel and Selva Prabhu on winning the Silver and Bronze respectively 🙌🏽💙
Let’s #Cheer4Bharat #WeAreTeamIndia | #TogetherWeDream pic.twitter.com/AZIBYrA8ce
— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2026
दुसरीकडे, सेल्वा प्रभूने सुरुवातीपासूनच स्थिर कामगिरी करत प्रगती केली. 15.87 मीटरने सुरुवात केल्यानंतर त्याने 16.17 आणि 16.43 मीटर मजल मारली. पाचव्या फेरीतील 16.52 मीटरच्या उडीने त्याला कांस्यपदक मिळवून दिले, ज्यामुळे तो प्रवीणच्या फक्त 6 सेंटीमीटर मागे राहिला.





























































