टीम इंडियामध्ये उलथापालथ! रोहित शर्मा नकोच; वाद पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टीम इंडिया’मध्ये कर्णधारापेक्षा मोठा वाद उभा राहिल्याची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माला 2027च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनांमधून बाहेर ठेवण्याचा विचार निवड समिती करत होती, असा दावा एका माध्यमाच्या वृत्तात करण्यात आला आहे. मात्र, बीसीसीआयने रोहितला उघडपणे पाठिंबा दिल्यानंतर निवड समितीतील काही सदस्यांनी स्वतःची ‘फसवणूक झाल्याची भावना’ व्यक्त केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवरील तिसरा सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरेल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सामन्यापूर्वीच बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या चर्चांचे खंडन केले. यानंतर रोहितने लॉर्ड्सवर 138 धावांची दमदार खेळी साकारत टीकाकारांना चोख उत्तर दिले.

मात्र, एका माध्यमाच्या वृत्तानुसार, हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाचे मत वेगळे असून, रोहितसह टीम इंडिया 2027चा विश्वचषक जिंकू शकणार नाही, अशी भावना काही निवड समिती सदस्यांमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ने सार्वजनिकरीत्या रोहितला पाठिंबा दिल्यानंतर निवड समितीतील काही सदस्य नाराज झाले आहेत.