
प्राप्तिकर कर भरणारे 94 हजार तसेच इतर कारणांमुळे अपात्र ठरलेले 46 हजार असे एकूण 1 लाख 40 हजार शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत अपात्र ठरले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यात येत्या दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
























































