बेस्टच्या मजास डेपोमध्ये स्लॅब कोसळून तिघे कामगार जखमी; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी पूर्वेकडील बेस्टच्या मजास डेपोमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून तिघे कामगार जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. एका कामगाराच्या पायाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने कामगारांना उपचारासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गा शेजारील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार करून तिघांनाही घरी सोडण्यात आले. या घटनेने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मजास आगरमध्ये मेसर्स मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या ऑपरेटर्सच्या स्टोअर रूम‑कम‑विश्रांती कक्षात गुरुवारी सकाळी 06.45 वाजता स्लॅब कोसळला. प्लास्टरचे तुकडे कोसळल्यामुळे मेसर्स मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या ऑपरेटर्सचे अभियांत्रिकी विभागातील तीन मेकॅनिक जखमी झाले. रियान शेख (19), सलमान खान (23) आणि मुजमदिन खान (20) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.