भंडाऱ्यात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

जादूटोणा केल्याच्या केवळ संशयातून एका 65 वर्षीय वृद्धावर निर्घृणपणे प्राणघातक हल्ला आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले बळराम लांजेवार यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पीडिताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाळ लांजेवार (वय 45), विवेक लांजेवार (वय 25), प्रमोद लांजेवार (वय 40) आणि किशोर लांजेवार (वय 40, सर्व रा. मासल) यांना तत्काळ अटक करण्यात आली.