गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा अपघातात ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा अबान अहमद याचा झाशी येथे अपघातात मृत्यू झाला आहे. तुरुंगात असलेल्या भावाला भेटण्यासाठी जात असताना त्याची कार दुभाजकाला धडकली. गँगस्टर अतीक अहमद याची एप्रिल 2023 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून, कारचे तुटलेले भाग रस्त्यावर विखुरले. या अपघातात अबान अहमद याच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अबान अहमद हा अतीक अहमदचा सर्वात लहान मुलगा होता. अबान त्याच्या इतर मित्रांसोबत तुरुंगात असलेला भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी निघाला होता. अली अहमद झाशीच्या जिल्हा कारागृहात बंद आहे.