
अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी बोलता आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे. त्यासाठी सर्व चालकांना मराठी शिकवणी शासनाकडून सुरू करण्यात आली होती. त्यात 1 लाखापेक्षा जास्त टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी मराठीचे धडे गिरवल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केला.
या आढावा बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, मुंबई मराठी साहित्य संघ तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 17 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अभियानाचा समारोप केला जाणार आहे. मराठी शिकलेल्या सर्व चालकांना त्यावेळी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान
या अभियानाअंतर्गत 1 मेपासून अमराठी चालकांना मराठी भाषेची शिकवणी सुरू करण्यात आली होती. यासंदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांनी आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावे, असे आवाहन त्यांनी केले.
























































