
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारच्या दबावतंत्राचे आणखी एक उदाहारण पाहायला मिळाले. तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून पक्षाच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने कार्यक्रमासाठी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत वेळ दिली होती. मात्र त्यानंतरदेखील कार्यक्रम सुरू होता, असा आरोप करण्यात आला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांमधील वादामुळे या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी यांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 28 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली होती. मात्र न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन करण्यात आले, असा दावा करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


























































