
हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अमोल गांगणवाड यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गांगणवाड हे हिंगोली पोलीस नियंत्रण कक्षात नियुक्त होते. त्यांनी कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.


























































