
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील विविध पोस्ट खात्यांमध्ये तब्बल 23 हजार 757 पदांची भरती करण्यात येणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक अशा तीन विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष पूर्ण करणाऱया उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भरतीसंबंधी सविस्तर माहिती www.indiapost.gov.in या पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. अर्ज भरण्यास उद्या 31 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात होणार असून 21 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सरकारी नोकरीची संधी मिळविण्यासाठी हजारो तरुण या भरतीकडे आशेने पाहत असून, पोस्ट खात्यातील या मेगाभरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. ऐन गणेशोत्सवात ही मेगाभरती निघाल्याने बेरोजगार तरुणांना बाप्पा पावला आहे.
शैक्षणिक पात्रता – दहावी पास, संगणकाचे ज्ञान, सायकल चालवता यायला हवी.
वयाची अट – 21 सप्टेंबर रोजी 18 ते 40 वर्षे
फी – सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस 100 रु., एससी, एसटी, महिलांना फी नाही.
पगार
- ब्रांच पोस्ट मास्टर ः 12 हजार ते 29,380 रुपये
- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ः 10 हजार ते 24,470
- डाक सेवक ः 10 हजार ते 24,470
राज्यनिहाय जागा
महाराष्ट्र – 2431
पश्चिम बंगाल – 1762
उत्तर प्रदेश – 1691
उत्तराखंड – 452
तेलंगणा – 419
तामीळनाडू – 2118
पंजाब – 123
राजस्थान – 1009
ओडिशा – 1353
मध्य प्रदेश – 1450
बिहार – 1098
छत्तीसगड – 762
गुजरात – 499
कर्नाटक – 1116
झारखंड – 1379
हरयाणा – 325
आसाम – 414
आंध्र प्रदेश – 917
दक्षिण-पश्चिम विभाग – 2614
जम्मू-कश्मीर – 340
हिमाचल प्रदेश – 335
दिल्ली – 16
एकूण – 23,757
महाराष्ट्रातील जागा
सामान्य – 1016
ओबीसी – 600
एससी – 241
एसटी – 194
ईव्हीएसडब्ल्यू – 248
अन्य – 132



























































