
हिंदुस्थानचा महिला क्रिकेट संघ रविवारी प्रथमच आशिया कप टी-20 स्पर्धेत उतरणार आहे. हिंदुस्थानच्या संघाची ही मोहीम थायलंडविरुद्धच्या सामन्यापासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानचा संघ ‘अ’ गटामध्ये असून त्यांचा पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यावर्षी खेळलेल्या 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी नऊ सामने हिंदुस्थानने गमावले आहेत. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर हिंदुस्थानचा संघ आशिया कपमध्ये पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.
हिंदुस्थानी संघाची रणनीती
स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा डावाची सुरुवात करतील. जेमिमा रॉड्रिग्जच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी प्रतीक्षा रावत सांभाळेल. कर्णधार हरमनप्रीत काwरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. फिरकी गोलंदाजीचे नेतृत्व अनुभवी दीप्ती शर्मा, श्री चरनी आणि राधा यादव करतील. वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व रेणुका सिंग ठाकूर करेल.
थायलंड दुसऱया सामन्यासाठी सज्ज
थायलंडच्या संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँगवर 6 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता हिंदुस्थानविरुद्ध मैदानात उतरताना त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

























































