
बहुतेक संयुक्त बँक खाती ‘राइट्स ऑफ सर्वायव्हर्शिप’ अंतर्गत ठेवली जातात. जेव्हा एका खातेदाराचा मृत्यू होतो, तेव्हा पैसे जिवंत असलेल्या दुसऱया मालकाकडे जातात.
तुमच्या संयुक्त खात्यावर कोणीही एक किंवा हयात व्यक्ती असेल, तर हयात असलेल्या खातेदाराला बँकेत मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागते.
मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर बँक हयात असलेल्या व्यक्तीला खाते चालवण्याची किंवा त्यातील रक्कम वापरण्याची परवानगी देते. FD च्या बाबतीत मात्र दंड आकारला जात नाही.
बँक मृत व्यक्तीचे नाव खात्यातून कमी करून खाते केवळ हयात असलेल्या व्यक्तीच्या नावावर वर्ग करते. या प्रक्रियेला बँकेच्या भाषेत Deletion of Name असे म्हणतात.
जरी बँक हयात असलेल्या व्यक्तीला पैसे काढू देत असली, तरी मृत व्यक्तीच्या इतर कायदेशीर वारसांचा वारसा हक्काच्या कायद्यानुसार त्या पैशांवर अधिकार असू शकतो.


























































