
हवेत झेप घेण्याचे आणि आकाशातून जगाचा विहंगम नजरा डोळ्यात साठवण्याचे स्वप्न प्रत्येक अॅडव्हेंचर प्रेमी पाहतो. जर तुम्हालाही थ्रिल, रोमांचक अनुभव आणि निसर्गाची अनोखी अनुभूती एकाच वेळी घ्यायची असेल, तर पॅराग्लायडिंग हा तुमच्यासाठी उत्तम खेळ आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा पार्टनरसोबत येथे ट्रिप प्लॅन करू शकता. उंचच उंच डोंगर, हिरवीगार खोरी आणि मोकळे आकाश यांमध्ये उडण्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या हिंदुस्थानात अनेक अप्रतिम ठिकाणे आहेत.
हिंदुस्थानातील पॅराग्लायडिंग ठिकाणे खालीलप्रमाणे:
हिमाचल प्रदेश : बीर-बिलिंग
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील जोगिंदर खोऱ्यात वसलेल्या बीर-बिलिंगला ‘भारताची पॅराग्लायडिंग कॅपिटल’ म्हटले जाते. येथे सुमारे 2400 मीटर उंचीवरून उड्डाण सुरू होते.
सोलांग व्हॅली: हिमाचल प्रदेशातील हे पॅराग्लायडिंगसाठीचे दुसरे अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे.
नैनिताल
उत्तराखंडच्या कुशीत वसलेले नैनिताल हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन असून ते तलावांसाठी ओळखले जाते. परंतु तुम्ही येथे अॅडव्हेंचरसाठी जात असाल, तर भीमताल आणि नौकुचियाताल येथे नक्की जा. हजारो फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग करताना सभोवतालचा नजराणा अप्रतिम दिसतो.
कामशेत
चौफेर हिरवळ आणि डोंगरांच्या मध्ये पॅराग्लायडिंग करण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. महाराष्ट्रातील कामशेतमध्ये असाच अनुभव मिळतो. येथील सर्वात प्रसिद्ध टेक ऑफ पॉईंट ‘टॉवर हिल’ आहे, जिथून 900 ते 1200 फूट उंचीवरून उड्डाण केले जाते. त्यामुळे पहिल्यांदा पॅराग्लायडिंग करणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते.
गंगाटोक
हिंदुस्थानातील सर्वोत्तम पॅराग्लायडिंग ठिकाणांमध्ये सिक्कीमच्या गंगाटोकचाही समावेश आहे. येथे ‘दारा गाव’ येथून पॅराग्लायडिंग सुरू होते. हे ठिकाण 2200 फूट उंचीवर आहे. इथून हिमालयाचे विहंगम दृश्य दिसत असल्यामुळे पर्यटकांमध्ये या जागेचे मोठे आकर्षण आहे.
























































