
अल-हिंद आयएसआयएस दहशतवादी सय्यद फसीउर रहमान याला एनआयए विशेष न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. रहमानला सात वर्षे तुरुंगवास आणि 48,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सय्यद फसीउर रहमान हा दहशतवादी कटाच्या बैठकांमध्ये सामील असल्याचे आढळले होते. त्याने अल-हिंद गटाच्या सदस्यांसाठी जंगल-कॅम्प प्रशिक्षणाकरिता एका स्पोर्ट्स शोरूममधून तंबू आणि चाकू खरेदी केले होते.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी मेहबूब पाशा याने बंगळुरूमधील गुरुप्पनपल्या येथील आपल्या घरी अनेक बैठका घेतल्या होत्या. या बैठकांमध्ये रहमानने बंदी घातलेल्या आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी संघटनेचा राष्ट्रविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी जातीय दंगे भडकवण्याची आणि लक्ष्यित हत्या करण्याची योजना आखली होती. या कटाचा उद्देश आयएसआयएस/दाएश प्रांत स्थापन करणे हा होता, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले. या कटात सामील असलेल्या मॉड्यूलच्या स्थापनेचे नियोजन आणि संचालन करणाऱ्या ऑनलाईन सूत्रधाराचा शोध एनआयए घेत आहे.
बंगळुरु येथे 10 जानेवारी 2020 रोजी या प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. एनआयएने 23 जानेवारी 2020 रोजी अल-हिंद आयएसआयएस प्रकरण म्हणून त्याची पुन्हा नोंद केली. आजपर्यंत, एनआयएने 20 आरोपींविरुद्ध तीन आरोपपत्रे दाखल केली आहेत. यापूर्वी, ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेल्या खटल्यादरम्यान गुन्हा कबूल केल्यानंतर हनीफ खानला 14 जुलै रोजी दोषी ठरवण्यात आले होते.
NIA Special Court has sentenced Syed Fasiur Rehaman to seven years’ rigorous imprisonment and fined him Rs 48,000 in the Bengaluru Al-Hind ISIS terror conspiracy case. NIA said he participated in conspiracy meetings and procured tents and knives for training. The agency has filed… pic.twitter.com/A7YM7REJPD
— IANS (@ians_india) August 30, 2026
























































