Ratnagiri News – आंगवली लाखणवाडीत रिक्षा उलटली; बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडीतील तीव्र उतारात रिक्षा उलटून झालेल्या अपघातात बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. विजय काशिराम चव्हाण (वय-५२) असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच चव्हाण यांना देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले.अपघाताची माहिती समजताच देवरूख पोलीसांनी घटनास्थळी जावून केला पंचनामा केला. विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच बोंड्येतील ग्रामस्थ व देवरूखातील रिक्षाचालकांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.