उत्तर सायप्रसमध्ये 270 लोकांना घेऊन जाणारी बोट उलटली; 6 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ रविवारी 270 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक फेरी बोट उलटली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट किरेनिया बंदरातून मर्सिन प्रांतातील तास्कू या तुर्की बंदराकडे जात होती. दुर्घटनेनंतर शोध मोहीम आणि बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्यासाठी तटरक्षक दलाची जहाजे, हेलिकॉप्टर आणि नागरी बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सायप्रसच्या उत्तर किनाऱ्यावरील डायना बीचजवळ ही बोट बुडाली. किनाऱ्यापासून सुमारे 7.5 किलोमीटर अंतरावर बोटीमध्ये पाणी भरू लागले. या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, असे निकोसियातील तुर्कीचे राजदूत अली मुरात बसीशी यांनी सांगितले. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.