
राज्य निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीम राबवून तयार केलेली प्रारुप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे उडवली गेली आहेत. यावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टीसह निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. तसेच लोकसभा, विधानसभा की एसआयआर, नेमकी कोणती यादी खरी? असा सवालही केला.
राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. भाजप आणि वोट चोरी आयोगाच्या पद्धती बदलत राहतात आणि बदल राहतील. मात्र उद्देश एकच आहे, तो म्हणजे कोणत्याची किंमतीत भाजपचा विजय आणि देशाच्या लोकशाहीचा अंत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
महाराष्ट्रातील 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्येत झालेल्या वाढीचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान अचानक 39 लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. तेव्हा मीही म्हटले होते आणि आजही म्हणतो की ही मतचोरी होती, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील 2026 च्या एसआयआर प्रक्रियेचाही उल्लेख केला.
एसआयआर अंतर्गत वगळण्यात आलेल्या नावांपैकी 91 टक्के नावे अपीलनंतर पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावी लागली. याचाच अर्थ 10 पैकी 9 नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली आणि निवडणुकीनंतर पुन्हा समाविष्ट करण्यात आली. मी तेव्हाही म्हटले आणि आजही म्हणतो ती वोट चोरी होती, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपा और ‘वोट चोरी आयोग’ के तरीके बदलते रहते हैं, और बदलते रहेंगे – मकसद बस एक ही है: किसी भी क़ीमत पर BJP की जीत, और भारत के लोकतंत्र का अंत।
महाराष्ट्र 2024 – लोकसभा और विधानसभा चुनाव के बीच अचानक 39 लाख नए वोटर जुड़ गए। मैंने तब भी कहा था, आज भी कहता हूँ: यह वोट चोरी थी।…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 1, 2026
आता महाराष्ट्रातील 2.7 कोटी मतदारांना ड्राफ्ट मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. याचा अर्थ प्रत्येक पाचवा मतदार यादीतून वगळण्यात आला, असे म्हणत राहुल गांधी लोकसभा निवडणूक 2024, विधानसभा निवडणूक 2024 आणि एसआयआर 2026 मधील मतदारसंख्येची आकडेवारीही मांडली.
लोकसभा निवडणुकीवेळी 9.27 कोटी मतदार होते, विधानसभा निवडणुकीवेळी 9.7 कोटी मतदार होते आणि आता एसआय 2026 मध्ये 7.76 कोटी मतदार आहेत. मग यापैकी नेमकी कोणती मतदार यादी योग्य होती? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. वोट चोरीने बनलेल्या सरकारसाठी जनता महत्त्वाची नसते. त्यामुळेच भाजप ना जनतेचे ऐकते, ना जनादेशाचा आदर करते, असा आरोप शेवटी राहुल गांधी यांनी केला.




























































