अमेरिकेचा इराणवर पुन्हा बॉम्बहल्ला, आयआरजीसीचे तळ उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने पुन्हा इराणला लक्ष्य केले आहे. अमेरिकन लष्कराने इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) शी संबंधित तळांवर जलदगतीने हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) मंगळवारी रात्री या हल्ल्यांची पुष्टी केली. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणशी संबंधित अनेक तळांना लक्ष्य केले आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, हे हल्ले मंगळवारी पूर्व वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरू झाले. होर्मुझमधील व्यापारी जहाजांवर आणि त्या भागात तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांवर आयआरजीसीने केलेल्या कथित हल्ल्यांनंतर ही कारवाई करण्यात आली, असा दावा अमेरिकेने केला आहे.