तेजस पाटील हिंदुस्थानच्या आशियाई तलवारबाजी संघात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी तलवारबाजी (फेन्सिंग) संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये पुण्याच्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाचा विद्यार्थी तेजस मनोज पाटील या मराठमोळय़ा खेळाडूने हिंदुस्थानी पुरुषांच्या ’फॉइल’ संघात आपले स्थान पक्के केले आहे. हिंदुस्थानी तलवारबाजी संघटनेच्या (फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया) निवड समितीने नुकतीच या पथकाची अधिकृत घोषणा केली. राष्ट्रीय मानांकन तसेच आशियाई वरिष्ठ तलवारबाजी चॅम्पियनशिप, जागतिक चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिपमधील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे. निवड झालेले सर्व खेळाडू पटियाला येथे 15 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय तयारी शिबिरामध्ये सहभागी होतील.