
मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढाईसाठी 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहचण्याचे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. त्यास प्रतिसाद देत आजपासूनच मराठा बांधवांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हाकेला ओ देत राज्यभरातील मराठा बांधवांनी टप्प्याटप्प्याने मुंबईकडे निघण्याची तयारी सुरू केली आहे. मोटरसायकल, बैलगाडी, ट्रक्टर, टेम्पो, ट्रकसह मिळेल त्या गाडीने मराठा समाजाच्या लोकांनी मुंबईकडे निघण्यास सुरुवात केली आहे, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले.


























































