
जम्मू-कश्मीकच्या कानाचक सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) गुरुवारी एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली. बीएसएफच्या 44व्या बटालियनच्या जवानांनी ही कारवाई केली. नझीर असे अटक केलेल्या घुसखोराचे नाव असून तो पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यातील लुनी गावाचा रहिवासी आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवरील सोहन बॉर्डर आउटपोस्ट जवळ ही घटना घडली. घुसखोराच्या अटकेनंतर बीएसएफ जवानांनी परिसराची कसून तपासणी केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या क्षेत्राचे उपमहानिरीक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नझीरची कसून चौकशी सुरू आहे.



























































