
शिंदे गटाचा डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे याने शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकेवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच हा ‘डोंबिवली पॅटर्न’ पालघरमध्येही समोर आला आहे. शहरातील रिलिफ हॉस्पिटलमध्ये एका जखमी गोविंदाच्या उपचारावरून डॉ. लिजिमोल व डॉ. विशाल कोडगीरकर या दोघा डॉक्टरांना शिवीगाळ करीत धमकी देण्यात आली तर विवेक झिंगा या कर्मचाऱयाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा रोहित गावीत, शहरप्रमुख राहुल घरत व नगरसेवक नीलम संखे यांच्यासह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































