गोकुळ अष्टमी उत्सवानिमित्त श्री विठ्ठलास पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
गोकुळ अष्टमी उत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलास आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी अलंकृत करण्यात आले. पारंपरिक अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
गोकुळ अष्टमी उत्सवानिमित्त श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभमणी, मोठा दंडपेठ्या जोड, हिऱ्याची कंगन जोड, बालाजी नाम एकपदरी कंठी, मोत्याचा तुरा, लहान शिरपेच, मत्स्य जोड, बाजीराव कंठी, सूर्यकळ्यांचा हार, तुळशीची माळ, तोडे जोड आदी पारंपरिक व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले.
गोकुळ अष्टमीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठलाचे हे मनोहारी रूप भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले असून, भाविकांनी भक्तिभावाने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. याबाबतची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.