
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग एका नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. हा स्फोटक सलामीवीर आता रिऑलिटी शोच्या दुनियेत प्रवेश करत आहे. सेहवाग ‘राईज ऍण्ड फॉल सीझन 2’ या रिऑलिटी शोचा सूत्रसंचालक म्हणून स्ट्रीमिंगच्या दुनियेत पदार्पण करणार आहे. या शोच्या निर्मात्यांनी गुरुवारी आगामी सीझनची पहिली झलक प्रदर्शित केली. ज्यामुळे प्रेक्षकांना सेहवागच्या एका नव्या बाजूची झलक मिळाली. आपल्या स्पष्टवत्तेपणा आणि निर्भीड क्रिकेट शैलीसाठी ओळखला जाणारा सेहवाग आता तीच गोष्ट या शोमध्ये आणणार का, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.


























































