
महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी प्रचंड दबदबा होता, मात्र आज महाराष्ट्र पोलीस फक्त राजकीय विरोधकांवर दंडेलशाही करणे आणि वसुली करणे एवढय़ाच कामासाठी उरलेले आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करणाऱया आणि गृह मंत्री म्हणून नापास ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी खुर्ची सोडावी, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज घणाघात केला.
राज्यातील कायदा आणि सुव्यस्वस्थेच्या स्थितीवरून सपकाळ यांनी गृह खात्याच्या कारभारावर टीका केली. फडणवीस सरकारमधील मंत्री अतुल सावे यांचे भाऊ आणि पुतण्यावर छत्रपती संभाजीनगर जिह्यात जबर हल्ला करण्यात आला. याआधी जळगावात पेंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली. त्यासाठी स्वतः पेंद्रीय मंत्र्यांना तक्रार दाखल करावी लागली. गुंड, मवाली, गँगस्टर यांना राजकीय आशीर्वाद मिळत असून ते खुलेआम फिरत आहेत, असे सपकाळ म्हणाले.


























































