अंबादास दानवेंकडून कळमनुरीतील धानोरा (ज.) येथील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळमनुरी तालुक्यातील धानोरा (ज.) येथून 22 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जलशुद्धीकरण केंद्र मागील काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. अंबादास दानवे यांनी कळमनुरी विधानसभेचे मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह सरकारवर सडकून टीका केली.

शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे हे शुक्रवारी नांदेडहून हिंगोलीकडे येत असताना सायंकाळी त्यांनी कळमनुरी तालुक्यातील धानोरा (ज.) या भागातील शेत शिवाराला भेट देऊन पाहणी केली. पावसाअभावी सोयाबीनचे उभे पीक पूर्णपणे वाळून गेलेल्या अवस्थेत दिसून आले. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्यामुळे सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच सन 1195 पासून 22 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या धानोरा (ज.) येथील मागील काही वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेल्या
जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. मागील काही वर्षांपासून 22 गावांना पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र बंद अवस्थेत असताना कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर काय करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित करत सरकारवरही सडकून टीका केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, जिल्हा संघटक बालासाहेब मगर, डॉ. रमेश मस्के (नाईक), मराठवाडा समन्वयक दिलीप घुगे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, ॲड.रवि शिंदे, मारोतराव खांडेकर, चंद्रकांत देशमुख, संतोष सारडा, शिवा शिंदे, अनिल खांडेकर,प्रदीप मस्के, अमोल काळे ,चेअरमन बंडू कोरडे, उपसरपंच टोपाजी पोटे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल पाईकराव, सुनील मस्के, उत्तम पोटे, मुंजाजी बर्गे, मोतीराम मोरे, निसारखा पठाण, सुदाम पाईकराव, सुभाष सरडे,गजानन पोले,रमेश ढबाले, भगवान खंदारे,भारत डोंगरे, बालाजी बरडे,सलीम पठाण, सुभाष सापनर रोजगार सेवक सुनील पाईकराव,ग्रामसेवक संभा पोटे,संतोष चिरमाडे यांच्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.