शिवभोजन केंद्र चालकांचे अनुदान सरकारने 10 महिन्यांपासून लटकवले, योजना बंद पडण्याच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीब आणि गरजू नागरिकांना दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण उपलब्ध करून देणाऱ्या शहरातील शिवभोजन केंद्र चालकांचे गेल्या दहा महिन्यांपासूनचे अनुदान सरकारने लटकवले आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. या दहा महिन्यांच्या कालावधीत काहींनी कर्ज काढून तर काहींनी दागिने गहाण ठेवून केंद्र सुरू ठेवले आहे. परिणामी त्यांची प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे.

शासनाच्या दुर्लक्षामुळे ही योजना बंद पडण्याचा मार्गावर असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. पेण शहरात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रांना नोव्हेंबर २०२५ पासून राज्य शासनाकडून एकही रुपया अदा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही शिवभोजन केंद्रे कर चालवायची, असा प्रश्न चालकांना उभा राहिला आहे. यापैकी काही चालकांनी तर अक्षरशः कर्ज काढून तर काहींनी आपले दागिने गहाण ठेवून शिवभोजन केंद्रे सुरू ठेवून गोरगरीब नागरिकांना पोटभर जेव देण्याची सोय सुरू ठेवली आहे परंतु लवकरच जर या शिवभोजन केंद्रांच्या चालकांना त्यांची उर्वरि बिलाची रक्कम मिळाली नाही ता गरीब नागरिकांसाठी सुरू असलेल् ही योजना बंद पडणार असल्याच भीती व्यक्त केली जात आहे. योजना बंद झालीच तर शिवभोजन केंद्राच्या चालकांचे नुकसान होणा असून गोरगरीबांच्या मुखातील घाम काढला जाणार आहे.

शिवभोजन केंद्रांच्या संचालकांना स्वतःचा प्रपंच चालवणेही अवघड झाले आहे. त्यातच गणेश उत्सव तोंडावर आल्याने सण कसा साजरा करायचा, असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

शिवभोजन केंद्रांची मे महिन्यापर्यंतची देयके अदा करणेकरीता ३ कोटी ७७ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले.

शिवभोजन केंद्रांची देयके देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच मे महिन्यानंतरची अनुदानाची रक्कम पुढील निधी प्राप्त झाल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांनी दिली.