
तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गटांना वापरण्यास मनाई केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला नवे नाव दिले. ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ असे त्यांच्या पक्षाचे नवे नाव आहे. तर ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर काही आमदारांनी ममता बॅनर्जी यांच्याशी गद्दारी करत स्वतंत्र गट स्थापला. हाच गट मूळ पक्ष असल्याचे सांगत त्यांनी पक्षावर व ‘गवत फूल’ या चिन्हावर दावाही केला. ममता बॅनर्जी यांनी त्यास आव्हान दिले. हा वाद निवडणूक आयोगापुढे होता. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आयोगाने दोन्ही गटांना मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई केली. त्यानंतर आज दोन्ही गटांना नवे नाव आणि चिन्ह देण्यात आले.
गद्दार गटाला लिफाफा
अरुप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गद्दार आमदारांच्या गटाला ‘डेमोव्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आले आहे. तर लिफाफा हे निवडणूक चिन्ह वितरित करण्यात आले आहे.



























































