
गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. परंतु यंदाचे आकर्षण होते ते मुंबईत अवतरलेल्या कोकणाचे. एका भाविकाने लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी यंदा कोकणाचा देखावा सादर केला आहे. परळ येथील पराग सावंत यांनी आपल्या घरी ‘लालपरीची कोकणवारी’ हा देखावा साकारला असून पराग यांनी त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ हा देखावा उभारला आहे. आजीसोबत लालपरीतून केलेली कोकणवारी आणि तिच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांनी हा देखावा उभारला आहे.
सावंत कुटुंबीयांनी एसटीच्या समोरील काचेमध्ये संपूर्ण कोकण उभा केला आहे. कोकण सुंदर म्हणून जपण्यापेक्षा कोकण आपलं म्हणून जपूया असा आज्जीने दिलेला संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सावंत कुटुंबीयांनी हा देखावा उभारला आहे.





























































