संत वारांगना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक प्रांतातील रंगपट्टण येथील वारांगना, जिच्याकडे अफाट संपत्ती होती. आपली श्रीमंती सत्कारणी लागत नाही याचे दुःख तिला होते. श्रीरंगाचे एकदा तरी दर्शन व्हावे, ही तिची इच्छा होती. तिला श्रीरंगाच्या मंदिरात जाण्यास मनाई होती. तिने दिलेले दानही नाकारले जाई. तिला श्रीरंगाचा ध्यास लागला होता. रात्रंदिवस ती त्याचे नामस्मरण करीत असे. परंतु आपल्या नामस्मरणाला किंमत नाही, ही भावना तिच्या मनाला दुःख देत होती. एकदा संतमहंतांचा तांडा तिच्या बागेत विश्रांतीसाठी थांबला. तिला खूप आनंद झाला. तिने त्यांच्यासाठी फळं, फराळ याची सोय केली परंतु त्यांना आपल्याबाबत सत्य कळले तर ते फराळाला हातही लावणार नाहीत, याची जाणीव झाली. शेवटी तिने एका ताटात सोन्याच्या मोहरा आणि द्रव्य भरून ते ताट महंतांपुढे ठेवले. महंतांना सत्य काय ते उमजले आणि ते स्वत वारांगनेला श्रीरंगाच्या दर्शनासाठी घेऊन गेले. तिला फुलं वाहायला सांगितली. यावेळी श्रीरंगाने तिच्यासमोर मान झुकवली, अश आख्यायिका याबाबत सांगितली जाते.