चांदी आठवडाभरात 8 हजारांनी महागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सराफा बाजारात चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. चांदी आठवडाभरात थेट 8 हजार रुपयांनी महाग झाली आहे. एक किलो चांदीचा दर 7 हजार 988 रुपयांनी वाढून 2.37 लाख रुपये झाला आहे. गेल्या आठवड्यात हा दर 2.29 लाख रुपये होता. चांदीप्रमाणे सोन्याच्या किमतीही वाढल्या आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 1.52 लाख रुपयांवरून वाढून 1.54 लाख रुपये झाला आहे. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 1 हजार 789 रुपयांची वाढ झाली आहे. या वर्षी सोने-चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 2026 मध्ये आतापर्यंत सोने 21 हजार रुपयांनी महागले आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1.33 लाख रुपये होती.