बँका आणि पोस्टात 37,463 पदांची भरती; अर्ज करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयबीपीएस मार्फत बँकेत भरल्या जाणाऱया 13 हजार 706 पदांच्या जागा आणि भारतीय डाक विभागात जीडीएस पदांच्या एकूण 23 हजार 757 अशा एकूण 37 हजार 463 पदांच्या जागांसाठी अर्ज करायला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे.

आयबीपीएस मार्फत भरल्या जाणाऱया एकूण 13 हजार 706 पदांसाठी पूर्वपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2026 तर मुख्य परीक्षा डिसेंबर किंवा फेब्रुवारी 2027 रोजी होईल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://ibpsreg.ibps.in वर देण्यात आली आहे. देशभरातील विविध पोस्ट खात्यांमध्ये तब्बल 23 हजार 757 पदांची भरती करण्यात येणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक अशा तीन विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष पूर्ण करणाऱया उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिता www.indiapost.gov.in या पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

आयबीपीएसमधील जागा

  • ऑफिस असिस्टंट                    (मल्टीपर्पज) 8,183
  • ऑफिसर स्केल-1                     (असिस्टंट मॅनेजर) 4,256
  • ऑफिसर स्केल-II                     (जनरल बँकिंग ऑफिसर)                                   (मॅनेजर) 666
  • ऑफिसर स्केल-2                     (आयटी) 182
  • ऑफिसर स्केल-2                     (सीए) 81
  • ऑफिसर स्केल-2                     (लॉ) 4
  • ऑफिसर स्केल-2                     (ट्रेझरी मॅनेजर) 18
  • ऑफिसर स्केल-2                     (मार्केटिंग ऑफिसर) 16
  • ऑफिसर स्केल-2                     (अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर) 38
  • ऑफिसर स्केल-3                     220