कार वाहून गेल्याने आठ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील नलखेडा येथे शनिवारी माँ बगलामुखी मंदिराजवळील पावसाळी नाल्याच्या वेगवान प्रवाहात भाविकांनी भरलेली कार वाहून गेली. यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 मुले, 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. मृतांपैकी 7 जण ओडिशातील रहिवासी होते, तर कारचालक अरुण गोयल हा आगर माळवा जिह्यातील बडोदचा रहिवासी होता.